अवैध पिस्तुल व दोन तलवारीसह एका आरोपीस अटक
धाराशिव : अवैध पिस्तुल व दोन तलवारीसह एका आरोपीस अटक करण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना यश आले आहे. एक आरोपी फरार झाला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
स्था.गु.शा. च्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दि. 08.06.2023 रोजी एक काळ्या रंगाची वेरना कारमध्ये दोन इसम असुन त्यापैकी एका इसमाच्या कमरेला पिस्तुल सारखे शस्त्र आहे.व ती कार लातुर रोडने तुळजापूर मार्गे कामटा शिवारात येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर ठिकाणी सापळा लाउन होते.
यावर सायंकाळी 19.00 वा. सु.एक काळया रंगाची वेरना कार कामठा गावाकडुन येत असताना दिसली असता पथकाने तिस हाताने थांबण्याचा इशारा केला असता ती कार पथकापासुन 100 फुट अंतरावर थांबली त्यातुन एक इसम उतरुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला व दुसरा इसम गाडीमध्ये मिळुन आला. मिळुन आलेल्या इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव – ओंकार प्रदिप कांबळे , वय 18 वर्षे, रा. कांक्रंबा ता. तुळजापुर, उस्मानाबाद असे सांगीतले. तसेच पळुन गेलेल्या इसमाचे नाव विचारता त्याचे नाव जमीर सय्यद रा.कामठा ता.तुळजापुर असे असल्याचे सांगितले. ओंकार कांबळे याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्टल व दोन लोखंडी तलवारी, कार सह असा एकुण अंदाजे 14,15,000₹ किंमतीचा मुददेमाल मिळुन आला. यावर पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील नमूद पिस्तुल व कार जप्त करुन त्याच्याविरुध्द तुळजापुर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 232/2023 हा शस्त्र कायदा कलम- 3/25,4/25 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक,अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे सपोनि- मनेाज निलंगेकर, पोउपनि- . संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- वल्लीवुल्ला काझी, शौकत पठाण, जावेद काझी, अमोल निंबाळकर , साईनाथ आशमोड, पांडुरंग सावंत, विजय घुगे, वैशाली सोनवणे, शैला टिळे यांच्या पथकाने केली आहे.