लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू विवाहातील दागिन्यांसह पसार 
 

अंबीतील तरुणाची फसवणूक , नांदेडच्या वधूसह चौघांना बेड्या 
 
s

अंबी  :  अंबीतील एका तरुणाचे लग्न जमले, डोक्यावर अक्षता पडल्या आणि दुसऱ्यास दिवशी वधूने विवाहातील दागिन्यांसह तीच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पसार झाली, याप्रकरणी पोलिसांनी वधूसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. 

अंबी येथील विश्वनाथ भोसले या तरुणाचा विवाह नांदेड येथील एका तरुणी सोबत दि. 18 सप्टेंबर रोजी मोजक्या लोकांसमक्ष संपन्न झाला.  दुसऱ्या दिवशी लघुशंकेच्या बहान्याने ती नववधू विवाहातील दागिन्यांसह तीच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पसार झाली. यावरुन अंबी पो.ठा. येथे गु.र.क्र. 146 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 406, 420, 34 अंतर्गत नोंदवण्यात आला.

            अंबी पो.ठा. च्या सपोनि- आशिष खांडेकर, पोहेकॉ- पाटील, पोना- लक्ष्मन माने, सिध्देशवर शिंदे, पोकॉ- सतीश राऊत, रामकिसन कुंभार, प्रभु,  कातुरे, साबिया शेख यांच्या पथकाने गतीमान तपास केला. यातून बनावट वधू- पुजा ओढणे, आप्पा भांगे, शुभम दवणे, नारायण सोनटक्के अशा चौघांना विवाहातील दागिन्यांसह नांदेड येथून अटक केले आहे. 

From around the web