जिल्ह्यात लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा, दोन गुन्हे दाखल

 
Osmanabad police

वाशी  : वाशी तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी दत्तात्रय गायकवाड हे दि. 20.01.2022 रोजी 11.20 वा. पार्डी व इसरुप शीव रस्ता अतिक्रमणमुक्त करत होते. यावेळी पार्डी ग्रामस्थ- दिनकर व महादेव गोरखनाथ चौधरी या दोघा भावांनी रस्ता मोकळा करण्यास आडकाठी करुन गायकवाड यांना शिवीगाळ करुन व त्यांच्यावर दगड उगारुन त्यांना धक्काबुक्की केली. यावरुन दत्तात्रय गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील महावितरण कार्यालय नागरी- 3 चे मुख्य तंत्रज्ञ- हबीब शेख हे दि. 20.01.2022 रोजी 13.00 वा. सु. उस्मानाबाद येथील मदीना चौकात थकीत वीज देयक वसूलीचे कर्तव्य करत होते. यावेळी त्यांनी छोटू महताज मुजावर यांची वीज जोडणी थकबाकीमुळे बंद केल्याने मुजावर यांसह त्यांच्या तीन मुलांनी शेख यांना काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी‍ दिली. तसेच रोहित्रावरील वीज वितरण पेटीस स्वत:चे कुलूप लावून निघून गेले. यावरुन हबीब शेख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्या तीघांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद  : खामसवाडी, ता. उस्मानाबादयेथील शिवहारी भोसले यांनी दि. 20.01.2022 रोजी 15.00 वा. सु. केशेगाव येथील सार्वजनिक रस्त्यावर आपल्या ताब्यातील ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एन 609 हा रहदारीस धोकादायकपने उभा केला असतांना बेंबळी पोलीसांना आढळले.

 एकुरगा, ता. उमरगा येथील बळीराम कांबळे यांनी 16.30 वा. सु. उमरगा येथील सार्वजनिक रस्त्यावर आपल्या ताब्यातील वाहन रहदारीस धोकादायकपने उभा केला असतांना तर गुंजोटी रोड, उमरगा येथील शुभम युवराज स्वामी हे 17.00 वा. सु. उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 च्या बाजूस आपल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर धोकादायकपने अग्नि प्रज्वलीत करत असतांना उमरगा पोलीसांना आढळले.

यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द 283 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web