ईटकूरमध्ये लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा

एका आरोपीस सश्रम कारावासासह 1,500 ₹ दंडाची शिक्षा
 
Osmanabad police

कळंब : प्रविण भीमराव गाडे, उर्फ डिंपू, वय 25 वर्षे, रा. ईटकूर, ता. कळंब याने लोकसेवकाच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा, शिवीगाळ करुन धमकावल्याने कळंब पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा क्र. 01 / 2012 हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल- गोलेकर यांनी करुन उस्मानाबाद सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

            सदर सत्र खटला क्र. 91 / 2019 चा निकाल आज दि. 09 ऑक्टोबर रोजी जाहिर होउन आरोपी- प्रविण गाडे उर्फ डिंपू यास भा.दं.सं. कलम- 353 च्या उल्लंघनाबद्दल 2 वर्षे सश्रम कारावास व 500 ₹ दंड, भा.दं.सं. कलम- 323 च्या उल्लंघनाबद्दल 2 वर्षे सश्रम कारावास व 500 ₹ दंड आणि भा.दं.सं. कलम- 506 च्या उल्लंघनाबद्दल 2 वर्षे सश्रम कारावास व 500 ₹ दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

 
जुगार खेळल्या प्रकरणी 4 आरोपींना प्रत्येकी 300 ₹ दंड

अंबी  : जुगार खेळून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याप्रकरणी अंबी पो.ठा. हद्दीतील 4 व्यक्तींना प्रत्येकी 300 ₹ दंड असा एकुण 1,200 ₹ दंड व दंड न भरल्यास पाच दिवस साध्या कारावासाची शिक्षा दि. 07 ऑक्टोबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी सुनावली आहे.

From around the web