परंड्यात लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल

 
Osmanabad police

परंडा  : पंचायत समिती, परंडा येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी- संजिव शिंदे हे दि. 28 सप्टेंबर रोजी 15.30 वा. सु. कार्यालयात दैनंदीन कामकाज करीत होते. यावेळी विहीरीच्या फाईलवर सह्या करण्याच्या कारणावरुन कपिलापुरी, ता. परंडा येथील ग्रामस्थ- गुलाब मारुती शिंदे यांनी संजिव शिंदे यांना शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर धावून गेले. तसेच कार्यालयातील टेबल आदळ- आपट करुन, “तुझ्यावर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करीन.” अशी धमकी दिली. अशा प्रकारे गुलाब शिंदे यांनी लोकसेवकाच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन संजिव शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अपघात

उमरगा : सुधीर विठ्ठल मात्रे, रा. एकुरगा, ता. उमरगा हे दि. 24 सप्टेंबर रोजी 19.30 वा. सु. उमरगा चौरस्ता ते लातूर रस्त्याने मोटारसायकलने चालवत जात होते. दरम्यान बिरुदेव मंदीराजवळील रस्त्यावर अज्ञात चालकाने मो.सा. क्र. एम.एच. 25 एएन 9956 ही निष्काळजीपने चालवून सुधीर यांच्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक घटनास्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या सुधीर मात्रे यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web