लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा : दोन ठिकाणी गुन्हा दाखल 

 
crime

धाराशिव  : फर्शी गल्ली, उस्मानाबाद येथील- साबेर नुरुला चौधरी, फराज साबेर चौधरी, जुलाफिकार साबेर चौधरी, मुमताज चौधरी या सर्वांनी येडेशवरी जेन्स पार्लरच्या जागेच्या वादाचे कारणावरुन दि. 29.05.2023 रोजी 23.40 वा. सु. अंबीका वडापाव सेंटर समोर उस्मानाबाद येथे बेकायदेशीर जमावाला हटवण्यासाठी स्टापसह गेले असता  नमुद लोंकानी गैरकायद्याची मंडळी जमवून  आम्ही स्टाफ सह शासकीय काम करत असताना हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून काठीने, दगडाने मारहाण करुन जखमी केले. शासकिय काम पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. यावरुन आनंदनगर पोलीस ठाणेचे- पोलीस अंमलदार मारुती चांगदेव वाघ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 352, 332, 186, 143, 147, 148, 149, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : विजोरा, ता. वाशी येथील- ग्रामसेवक- विजयकुमार निवृत्ती घोडे हे दि 30.05.2023 रोजी 10.00 वा. सु. रोजी ग्रामपंचायत कार्यालय बावी येथे शासकीय काम करत असताना  बावी, ता. वाशी येथील- स्वाती किरण जगताप, किरण जगताप या दोघांनी आमचा निवडणुकीत 10 लाख खर्च झाला आहे. असे म्हणुन हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून. शासकिय काम पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. तुम्ही कामकाज कसे करता तुम्हाला बघुन घेऊ अशी धमकी दिली. यावरुन विजयकुमार निवृत्ती घोडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 506, 34अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

काटी येथे हाणामारी 


तामलवाडी  : काटी, ता. तुळजापूर येथील- ब्रम्हदेव भाले, अनिल ढगे, सौदागर घाणे, बबन ढगे, अक्षय माळी, सतीष भाले, मोहन हजारे, अन्य 4या सर्वांनी फोटोग्राफी न केल्याचे कारणावरुन दि.30.05.2023 रोजी 11.00 वा. दरम्यान काटी येथे गावकरी-समीर आयुब पठाण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहान केली. तसेच समीर यांचे वडील व भाउ हे समीर यांचे बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, लोखंडी रॉडने मारहान करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या समीर पठाण यांनी दि.30.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : काटी, ता. तुळजापूर येथील- समीर पठाण, हुजेर पठाण, आयुब पठाण, जुनेद पठाण, आझम पठाण कय्युम पठाण या सर्वांनी फोटोग्राफी न केल्याचे कारणावरुन दि.30.05.2023 रोजी 10.00 वा. दरम्यान काटी येथे गावकरी-ब्रम्हदेव पांडुरंग भाले यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहान करुन जखमी केले. तसेच कॉम्प्युटर व प्रिंटर फेकुन एक लाख्‍ रुपयाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या ब्रम्हदेव भाले यांनी दि.30.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 427, 323, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
                                                                                                                             

From around the web