नळदुर्ग : सेवानिवृत्तीचा लाभ मिळु नये फसवणूक 

 
Osmanabad police

नळदुर्ग  : सुरेश माधव नकाते (मयत), रा. नळदुर्ग हे गावातील नाईक मागास समाज सेवा मंडळ येथे नोकरीस होते. त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळु नये या वाईट उद्देशाने त्यांची सेवा पुस्तीका संस्थेतील वैभव व अमोल विठ्ठल जाधव या दोघा बंधुंनी नष्ट करुन दि. 1.12.2020 रोजीच्या कार्यमुक्ती प्रमाणपत्रावर सुरेश नकाते यांची खोटी स्वाक्षरी केली आहे. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- श्रीमती सुलभा नकाते यांनी दि. 11 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथमखबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 467, 468, 471, 477, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाणीचे दोन गुन्हे 

मुरुम : येणेगूर येथील सतीश बाबुराव गायकवाड व त्यांचा भाऊ राजेंद्र बाबुराव गायकवाड या दोघांच्या कुटूंबीयांचा जळणास आनलेल्या लाकडावरुन दि. 4 सप्टेंबर रोजी 15.30 वा. सु. राहत्या कॉलनीत वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही गायकवाड कुटूंबातील स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी कुटूंबातील स्त्री- पुरुषांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विळा, लोखंडी नळी, काठी, हातोडीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सतीश गायकवाड व राजेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

येरमाळा : बापु निवृत्ती गोरे, रा. शेलगाव, ता. कळंब हे दि. 09 सप्टेंबर रोजी 15.30 वा. सु. गावातील चोराखळी रस्त्यालगत गुरे चारत होते. दरम्यान ती गुरे रस्त्यावर आडवी आल्याच्या कारणावरुन गावकरी- लक्ष्मण हरी दिवाने यांनी बापु गोरे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गोरे यांच्या हातातीलच चाबकाच्या दांड्याने मारहान केल्याने गोरे यांचा दात अर्धवट तुटून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या बापु गोरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web