धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर अखेर नळदुर्ग पोलिसाना आली जाग 

तीन ठिकाणी छापेमारी, लाखो लिटर दारू जप्त 
 
crime
काळे धंदे झाकण्यासाठी गोरेंची चमकोगिरी 

नळदुर्ग पोलीस स्टेशनला सपोनि म्हणून सिद्धेश्वर गोरे जॉईन झाल्यापासून अवैध धंद्याला जणू पेव फुटले आहे. हातभट्टीची दारू उघडपणे विकली जात आहे तर मटका राजरोस सुरु आहे. या संदर्भात धाराशिव लाइव्हने बातम्या दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गोरे यांचे कान  चांगलेच टोचले आहेत. त्यामुळे गोरेने आपले काळे धंदे झाकण्यासाठी काही ठिकाणी छापेमारी करून चमकोगिरी केली आहे. 

नळदुर्गजवळील पाटील आणि येडोळा तांड्यावर लाखो लिटर हातभट्टी दारूची गाळप होत असताना, नळदुर्ग पोलीस हप्ता घेऊन आजवर मूग गिळून गप्प होते. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर पोलिसांना जाग  आली आहे. 

 पोलीस ठाणे नळदुर्ग चे पथकाने काल रविवार दि.23.07.2023 रोजी अवैध मद्य विरोधी 3 छापे टाकले. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 7,200 लि. आंबवलेले रासयनिक द्रव्य जप्त करण्यात आले. मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्याची किंमत अंदाजे 3,60,000 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत नळदुर्ग पोलीस ठाणे येथे 3 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. यात येडोळा, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद  येथील- मंगलबाई धोंडीबा राठोड, या विष्णू जाधव यांचे शेताजवळ येडोळा शिवार येथे गावठी दारु निर्मीतीचे सुमारे 1,400 लि. अंबवलेला रासायनिक द्रव बाळगलेले ते जप्त करण्यात आले. तर अक्कलकोट रोड नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथील-लक्ष्मी प्रकाश आडे या याच दिवशी 09.20 वा. सु. येडोळा शिवार येथे गावठी दारु निर्मीतीचे सुमारे 2,200 लि. अंबवलेला रासायनिक द्रव बाळगलेले ते जप्त करण्यात आले. तर येडोळा तांडा, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथील- रवी धोंडिबा राठोड, हे भगवानसिंग परिहार यांचे शेताजवळ नदीचे पात्रात गावठी दारु निर्मीतीचे सुमारे 3,600 लि. अंबवलेला रासायनिक द्रव बाळगलेले ते जप्त करण्यात आले.

From around the web