नळदुर्ग - सात घरफोडीतील अट्टल चोर अटकेत 

 
s

 नळदुर्ग : सात विविध घरफोडीतील अट्टल चोर मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.  सुरज शिंदे असे या अट्टल चोराचे नाव आहे. 


स्था.गु.शा. च्या पोनि  गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- शैलेश पवार, पोउपनि- . पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- योगेश कोळी, बबन जाधवर, अविनाश मारलापल्ले, आरसेवाड यांच्या पथकाने दि. 27.10.2021 रोजी हंगरगा फाटा येथील सुरज शिंदे यास गोपनीय खबरेच्या आधारे ताब्यात घेतले. 

त्याच्या ताब्यात 91 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळल्याने त्या बाबत तो सविस्तर माहिती देउ शकला नाही. पोलीसांनी अभिलेख अभ्यासले असता नळदुर्ग पो.ठा. 234, 235, 324, 325 / 2021, लोहारा- 144, 183 / 2021 व तुळजापूर पो.ठा. 286 / 2021 अशा 7 घरफोडींच्या गुन्ह्यातील ते दागिने असल्याचे निष्पन्न झाले. 

असे आहेत सात गुन्हे 

1) पोस्टे नळदुर्ग 234/2021 कलम 457,380 भादवी 
2) पोस्टे नळदुर्ग गुरनं. 235/2021 कलम 457, 380 भादवी, 
3)नळदुर्ग गुरनं. 324/2021 कलम 454,457,380 भादवी,
4) पोस्टे नळदुर्ग गुरनं. 325/2021 कलम 457, 380 भादवी,
5) पोस्टे लोहारा गुरनं. 144/2021 कलम 458, 380,34 भादवी,
6) पोस्टे लोहारा. 183/2021 कलम 454,380 भादवी,
 7) तुळजापूर गुरनं. 286/2021 कलम 457,380 भादवी,     

From around the web