मुरूम :  लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार 

 
crime

 मुरुम  : एका गावातील एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) मार्च 2023  रोजी सदर मुलगी ही आपल्या घरात एकटी असल्याची संधी साधून गावातील एका तरुणाने सदर मुलीस आपल्या घरी नेऊन लग्नाचे अमिष दाखवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतीने दि.15.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-376, 376(3) सह पोस्को  कलम 4, 6 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरीचे दोन गुन्हे दाखल 

भूम  :  औदुंबर कॉलनी, पुणे येथील- पल्लवी महेश आलदार, वय 23 वर्षे, या दि. 12.06.2023 रोजी 17.15 वा. सु. सरमकुंडी ते भुम प्रवासा दरम्यान पल्लवी यांचे बॅगमधील  58 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे, एकुण 1,45,000 ₹ किमंतीचा माल गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या पल्लवी आलदार यांनी दि.15.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : बार्शी नाका, उस्मानाबाद येथील- आकाश चंद्रकांत सुरवसे, वय 26 वर्षे, यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्र एम एच 25 एएन 9888 ही दि. 07.06.2023 रोजी ते 08.06.2023 रोजी 09.00 वा. सु. समर्थ नगर करंजकर हॉस्पीटल पाटीमागुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या आकाश सुरवसे यांनी दि. 15.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  मारहाण

मुरूम  : केसरजवळगा, उमरगा येथील- सुभाष माळी, योगेश माळी, विश्वनाथ माळी, पोलीसात तक्रार दिल्याचे कारणावरून दि.13.06.2023 रोजी 02.00 वा.सु. केसरजवळगा शिवारात गावकरी- सुनिल सुर्यकांत माळी यांना सुभाष यांनी  शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, कुह्राडीने डोक्यात व उजव्या हातावर मारहाण करुन गंभीर जखमी केले.तर येगेश यांनी सुनिल यांचे उजव्या पायावर काठीने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुनिल माळी यांनी दि. 15.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम-326, 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web