मुरूम :  कौटुंबिक वादाच्या कारणावरुन पतीची पत्नीस बेदम मारहाण 

 
crime

मुरुम  :ज्योती लमाण तांडा, आलुर येथील-सुभाष हिरु पवार यांनी दि.16.05.2023 रोजी 19.30 वा.दरम्यान कौटुंबिक वादाच्या कारणावरुन पत्नी- सुनिता सुभष पवार यांना शिवीगाळ करुन लाथबुक्यांनी, कुह्राडीचे दांड्याने मारहान करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कॅण्डमधील डिझेड सुनिता यांचे अंगावर ओतले. अशा मजकुराच्या सुनिता पवार यांनी दि.16.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-307, 324  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

 
गावशिवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

ढोकी  : गोटेगाव, ता. केज येथील- राहुल तुकाराम पवार हे दि.15.05.2023 रोजी 13.30 वा सुमारास तेर येथे श्री संत गोरोबा काका मंदीरात सभा मंडपाचे आवारात मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना ढोकी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web