कळंब तालुक्यात तरुणाचा खून
वाशी : ईटकुर, ता. कळंब येथील- रणजीत मधुकर फरताडे, वय 49 वर्षे, यांचा मुलगा नामे- राहुल रणजीत फरताडे, वय 27 वर्षे, यास दि.30.06.2023 रोजी 09.00 ते 11.00 वा. सु. मौजे मांडवा येथील इदगाह पारधी पिढी जवळील घोडकी रस्त्यालगत अज्ञात व्यक्तीने चेहऱ्यावर, डोक्यात, व गळ्यावर घातक धारदार हात्याराने वार करुन जिवे ठार मारले आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील-रणजीत मधुकर फरताडे यांनी दि.01.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
लोहारा : तावशीगड, ता. लोहारा येथील- गोविंद दंडगुले, दुर्गाप्पा दंडगुले यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि.01.07.2023 रोजी 08.45 वा. सु. धनराज चंद्राशं घोटाळे यांचे शेताजवळ रोडवर तावशिगड शिवार येथे गावकरी- मुकींदा बालाजी दंडगुले यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, कुर्हाडीने डाव्यादंडावर मारुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मुकींदा दंडगुले यांनी दि.01.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : जेवळी, ता. लोहारा येथील- भोजाप्पा कारभारी, प्रदिप कारभारी, रविराज कारभारी, पृथ्वीराज कारभारी, योगीराज कारभारी या सर्वांनी दि.27.06.2023 रोजी 20.30 वा.सु. भांजाप्पा कारभारीचे दुकानाजवळ जेवळी येथे गावकरी- संदीप बाबु जाधव यांना ये लमान तु येथे का थांबलास असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने, चामडी बेल्ट, लोखंडी पाईपने मारहाण करुन गळ्यातील चैन काडून घेतली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संदीप जाधव यांनी दि.01.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 327, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.