कळंब तालुक्यात जुन्या वादातून एकाचा खून 

 
Osmanabad police

कळंब  : जुन्या वादातून तालुक्यातील रत्नापूर येथील एकाचा खून करून मृतदेह नदी पात्रात टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रत्नापूर, ता. कळंब येथील फुलचंद महादेव निकम, वय 57 वर्षे यांचा मृतदेह दि. 13 ऑक्टोबर रोजी ईटकुर जवळील नदिपात्रात आढळल्याने अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2021 नोंदवून फौ.प्र.सं. कलम- 174 नुसार चौकशी सुरु करण्यात आली होती. 

कन्हेरवाडी ग्रामस्थ- भागवत शंकर कवडे यांसह त्यांचे कुटूंबीय- लता, दत्ता, सचिन यांनी जुन्या वादातून फुलचंद यांना मारहान करुन त्यांचा खून करुन मृतदेह नदी पात्रात टाकला आहे अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- गौरव याने चौकशी दरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरून भा.दं.सं. कलम- 302, 201, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सोयाबीन पिकाचा ढिग जाळणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल

लोहारा : करवंजी, ता. लोहारा येथील तानाजी हाके यांनी त्यांच्या गट क्र. 206 मधील शेतात सुमारे 1.6 हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचा ढिगारा उभारला होता. तो ढिगारा दि. 12- 13 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री अज्ञाताने पेटवून दिल्याने हाके यांचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या हाके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web