उस्मानाबादेत खून 

 
crime

उस्मानाबाद  : तांबारी विभग,उस्मानाबाद येथील- करण कृष्णा पवार, वय 22 वर्षे याने  दि. 14.02.2023 रोजी 10.45 वा पुर्वी भोसले हायस्कुल उस्मानाबाद च्या जुन्या बोर्डींग मधील पडक्या रुममध्ये अज्ञात कारणासाठी  शेंडगंगल्ली भुम येथील- रामेश्वर विश्वनाथ शेवकर वय 76 वर्षे यांचे डाव्या डोळ्याच्या वरील भागास कशानीतरी वार करून जखमा करुन खुन केला. अशा मजकुराच्या प्रमोद नरसिंग कदम रा. तांबारी विभाग उस्मानाबाद यांनी दि.14.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
कळंबमध्ये  चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 कळंब : बालाजी मंदीराजवळ, कळंब येथील- मनोज झुंबरलाल मालपाणी यांची अंदाजे 2,00,00 ₹ किंमतीचा अशोक लिलॅड दोस्त मालवाहक वाहन क्र.एम.एच.25 पी 3078 ही दि.12.02.2023 रोजी 22.00 ते दि. 13.02.2023  रोजी 08.00वा. दरम्यान मालपाणी यांचे घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या मनोज मालपाणी यांनी दि. 14.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

 
कळंब  : शेळके धानोरा, ता. कळंब येथील- प्रायेकित जीवन पुरेकर यांची अंदाजे 50,000 ₹ किंमतीची होडां शाईन मोटारसायकल क्र.एम.एच.12 टीएम 7949 ही दि.13.02.2023 रोजी 12.40 ते 13.00 वा. दरम्यान एस बी आय बॅक कळंब समोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रायेकित पुरेकर यांनी दि. 14.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

From around the web