वाशी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
Aug 22, 2023, 14:46 IST

वाशी : तालुक्यातील तांदुळवाडीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या २८ वर्षीय एका नराधमांविरुद्ध वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वानंद रघुनाथ गाढवे असे या नराधमाचे नाव आहे.
आरोपी नामे- स्वानंद रघुनाथ गाढवे, वय 28 वर्षे रा. तांदुळवाडी, ता. वाशी जि. उस्मानाबाद, यांनी गावातील एका अल्पवयीन मुलीस मार्च ते एप्रिल 2023 मध्ये रात्री 11.00 ते 12.00 वा. सु. मुलीच्या घराजवळील पडीक जागेवर नेवून जबरदस्तीने तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच ही गोष्ट घरी सांगितली तर तुला व तुझ्या आई वडीलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
याप्रकरणी पिडीतीने दि.21.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-376, (2)(एन), 376(3), 506 सह 4, 6, 8, 12 बा.लैं.अ.प्र.अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.