वाशीमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 
crime

वाशी  : एका गावातील एक 14 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि.05.05.2023 रोजी 20.00 वा. सु. नमुद मुलगी ही टपरीवर बसलेली असताना आरोपी नामे- 1)विजय अंकुश शेटे रा. वाशी जि. उस्मानाबाद यांनी नमुद मुलीचे तोंड दाबून तिस टपरी मागे नेवून तिचेवर लैंगीक अत्याचार केला. कोणास काही सांगीतलेस तर जिवे ठार मारुन टाकण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि. 14.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 376, 506, सह पोक्सो कायदा कलम 4, 6, 8, 12 सह अ.जा.ज.अ.प्र.का. कलम 3,(2),(व्हि.ए) अन्वये वाशी पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

फसवणुक

नळदुर्ग : फिर्यादी नामे- संतराम भुजंगराव कांबळे, वय 66 वर्षे, रा. अणदुर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद हे दि.05.07.2023 रोजी एस.बी.आय. बॅक शाखेचे जवळील एटीएम नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे पैसे काढण्यासाठी गेले असता एका अनोळखी व्यक्तीची पैसे काढण्यासाठी मदत मागीतली त्यावर नमुद इसमाने एटीएम मधून 10,000₹ काढून दिले. व संतराम कांबळे यांना सागिंतले की तुमचे एटीमए ब्लॉक झाले असे सांगून एटीएम कार्डची अदलाबदली करुन संतराम कांबळे यांचे बॅक खात्यावरुन 94,000₹  काढून घेवून फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या संतराम कांबळे यांनी दि.14.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो.ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web