अणदूरमध्ये माथेफिरू पोराने वृद्ध वडिलांस लाथाबुक्क्यांनी मारहान करुन डोळा फोडला 

 
Osmanabad police

नळदुर्ग  : कौटूंबीक वादातून अणदुर, ता. तुळजापूर येथील भरत विलास घोडके यांनी दि. 15.01.2022 रोजी 22.00 वा. सु. आपल्या राहत्या घरी पिता- विलास बिरु घोडके, वय 70 वर्षे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन हातातील कड्याने विलास यांच्या डोळ्याजवळ मारुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या विलास घोडके यांनी दि. 16 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : पिंपळा (खु.), ता. तुळजापूर येथील सुभाष लक्ष्मण कदम यांनी चुलते- रामचंद्र विश्वंभर कदम यांच्या घरासमोरील भुखंडावर बांधलेले पत्रा शेड काढून घेण्यास रामचंद्र यांनी पुतण्या- सुभाष यास दि. 16.01.2022 रोजी 13.00 वा. सु. सांगीतले. यावर चिडून जाउन सुभाष यांसह सविता कदम या दोघांनी रामचंद्र कदम यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रामचंद्र कदम यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : कल्पनानगर, कळंब येथील शांताबाई विनायकराव भोसले, वय 62 वर्षे यांना दि. 16.01.2022 रोजी 08.00 वा. सु. त्यांच्या घरी असतांना त्यांचा मुलगा- गजेंद्र विनायकराव भोसले सुन- सुनंदा भोसले नातू- गौरव या तीघांनी मालमत्ता वाटणीच्या कारणावरुन त्यांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शांताबाई भोसले यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 सह जेष्ठ नागरिक अधिनियम कलम- 24 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web