उमरग्यात  इनोवा कारमध्ये सापडला साडेपाच लाखाचा गांजा 

 
d

उमरगा  :  हैद्राबाद कडून आलेल्या एका इनोवा कारमध्ये साडेपाच लाखाचा गांजा सापडला  असून, याप्रकरणी दोन संशयीय इसमांना उमरगा पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी सांगितले की , दि.17.06.2023 रोजी 00.00 ते दि 18.06.2023 रोजीचे 05.00 वा. पर्यंत चौरस्ता  उमरगा येथे  पोलीस निरीक्षक  राठोड, यांचे आदेशाने सफौ/499 सुर्यवंशी, पोलीस नाईक/1613 सय्यद, पोलीस अमंलदार /1752 घाटे,  1735/ भोरे, 1806 कांबळे असे नाकाबंदी करत असताना 04.30 वा. सु एक इनोवा कार क्र एपी 29 बी आर 1116 ही हैद्राबाद कडून आली असता तीस नाकाबंदी दरम्यान चेक करण्यासाठी थांबवली असता त्यामध्ये वाहन चलक व त्याच्या सोबत  एक इसम असे दोघे जण पळून जात होते. 

त्यांचेवर संशय बळावल्याने लागलीच त्यांचा पाठलाग करुन दोघांना पकडून घेवून  सदर वाहन पो स्टे ला अनुन नमुद वाहन चेक केले. त्यामध्ये अमली पदार्थ गांजाचे एकुण 27 पॉकेट मिळून आल्याने त्याचे एकुण 54.515 किलो वजनाचा गांजा त्याची एकुण किंमत 5,65,159 ₹ असा ईनोवा गाडीची 8,00,000 ₹  असा एकुण मुद्देमाल किंमत अंदाजे 13,65,150 ₹ मिळून आला आहे. यातील आरोपी नामे-1) अल्ताफ नजीर शेख, 2) महेबुब इलियास पठाण  दोघे रा. कुष्ठधाम कॉलनी, विवेकानंद चौक, सारोळा रोड, लातुर येथील असून त्यांना वरील मुद्देमालासह ताब्यात घेवून पोलीस स्टेशन उमरगा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  नवनित कॉवत, सहा. पोलीस अधीक्षक, रमेश बरकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरगा यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी- श्री. राठोड,  सपोनि महेश क्षिरसागर, सफौ/499 सुर्यवंशी, पोलीस नाईक/1613 सय्यद, पोलीस अमंलदार /1752 घाटे,  1735/ भोरे, 1806 कांबळे,गहिनीनाथ बिराजदार, सिध्देश्वर बिराजदार यांच्या पथकाने केली.  पुढील तपास सपोनि कासार करत आहे

अवैध गुटखा विक्री करणाऱ्याकर गुन्हा दाखल

बेंबळी  : करजखेडा, ता. उस्मानाबाद येथील- वैभव व्यकंट चव्हाण हे दि. 18.06.2023 रोजी 16.05 वा. सु. करजखेडा येथील आबासाहेब पुस्तकालय या दुकानामध्ये येथे गुटखा 14,363 ₹ किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु, पान मसाला विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेला बेंबळी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी प्रतिबंधीत गुटखा व तत्सम पदार्थासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द कलम- भा.द. सं. कलम 188, 272, 273, अंतर्गत बेंबळी येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web