कळंब तालुक्यात शेतीच्या वादातून एकाचा खून 

 
crime

 येरमाळा  :आरोपी नामे- रविंद्र लिंबराज तवले,  रा. शेलगाव ज. ता. कळंब जि. उस्मानाबाद यांनी शेतीच्या वादाच्या कारणावरुन दि.19.07.2023 रोजी 21.30 ते दि.20.07.2023 रोजी 06.45 वा. सु. शेलगाव ज शिवारातील शेत गट नं 173 येथे  मयत नामे- संतोष भुजंग तवले, वय 40 रा. शेलगाव ज ता. कळंब जि. उस्मानाबाद हे गोठ्यावर झेपलेले असताना आरोपी रविंद्र तवले  यांने संतोष यास धारधर हत्याराने गळ्यावर वार करुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ नामे- संदपि भुजंग तवले, वय 38 वर्षे यांनी दि.20.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 302 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 एकुरग्यात दोन गटात हाणामारी 

उमरगा  : आरोपी नामे-1)दगडू लक्ष्मण आगलावे, 2) आतिश दगडू आगलावे, 3)फुलचंद लक्ष्मण आगलावे, 4)लक्ष्मण खंडाप्पा आगलावे, 5) खंडाप्पा राम बागलावे, 6)सागर खंडाप्पा आगलावे, 7) व्यंकट सुर्यकांत जवळगे, 8) भालचंद्र विठ्ठल जवळगे, 9) राम तुकाराम जवळगे, 10) सुरज राम जवळगे, 11)उमाकांत बाबुराव जवळगे, 12) रामेश्वर शांतप्पा जवळगे, 13) सिध्देश्वर पळसे, 14) राम राजू पळसे, 15) सुहास निव.त्ती मुरुड आकुले, 16) परमेश्वर लक्ष्मण करके, 17) सुनिल भ्रत करके, 18) संजय विठ्ठल करके, 19)बस्वेश्वर दत्तात्रय कुन्हाळे, 20) गुलाब शिवाजी कुन्हाळे सर्व रा. एकुरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी निवडणूकीमध्ये तु आमचे विरुध्द प्रचार केल्यामुळे आमचा पॅनल पडला या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी नामे गोविंद व्यंकट जेवळे, वय 49 वर्षे, रा. एकुरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने हातावर मारुन जखमी केले. फिर्यादीची मुलीस गुलाब कुन्हाळे याने लोखंडी रॉडने मारुन जखमी केले. गोविंद यांची पत्नी, मुलगा, दोन मावस भवाचे जावाई मावस भावाच्या मुली यांना मारहान करुन जखमी केले. तसेच शेडचे नुकसान करुन घरातील संसार उपयोगी वस्तुचे नुकसान केले. व तुझे गावात मराठ्याच घर एकटच आहे. आम्ही तुला व तुझ्या कुंटूबाला गावात राहु देणार नाही अशी धमकी दिली.अशा मजकुराच्या गोविंद जेवळे यांनी दि.20.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 148, 149, 452, 326, 324, 323, 427, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा :आरोपी नामे- 1)गोविंद व्यंकट जेवळे, 2) अनिता गोविंद जेवळे, 3) श्रध्दा गोविंद जेवळे,4) वैभव गोविंद जेवळे, 5) मनोज ज्ञानेश्वर जेवळे सर्व रा. एकुरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि. 19.07.2023 रोजी 22.00 वा. सु. एकुरगा येथे फिर्यादी नामे- जगदेवी दगडू जवळगे, वय 60 वर्षे, रा. एकुरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद  या पतीच्या नावावर असलेल्या जागेत गेल्या असता वरील नमुद आरोपीनी जगदेवी  जवळगे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान करुन जखमी केले.तसेच आरोपी नामे गोविंद जेवळे यांनी जगदेवी जवळगे यांना काठीने मारहान करुन जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जगदेवी जवळगे यांनी दि.20.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-143, 147, 148, 149, 324, 504, 506अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : आरोपी नामे-1) रमनाबाई ज्ञानोबा चव्हाण रा. शिंगोली तांडा, ता.जि. उस्मानाबाद यांनी  शेतात पेरणी करण्याच्या व दगड वेचून टाकण्याच्या  कारणावरुन दि. 17.07.2023 रोजी 17.00 वा. सु. उपळा  शिवारातील शेत गट नं 138 येथे फिर्यादी नामे- काशिबाई धनु राठोड, वय 60 वर्षे रा. शिंगोली,ता.जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादीच्या डोक्यात दगडाने मारुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धामकी दिली.अशा मजकुराच्या काशिबाई राठोड यांनी दि.20.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : आरोपी नामे-1)बन्सी सुबराव काळे, 2) नाना बन्सी काळे, 3) कालीदास शिवराम काळे, तिघे रा. गायरान पारधी पिढी ईटकुर, ता. कळंब जि. उस्मानाबाद, 4) दादा आप्पाराव शिंदे रा. टोकणी पारधी पिढी ता. कळंब जि. उस्मानाबाद यांनी मागील भांडणाचे कारणावरुन दि. 20.07.2023 रोजी 16.00 वा. सु. गायरान पारधीपिढी ईटकुर येथे फिर्यादी नामे- मनिषा लहु काळे, वय 25 वर्षे रा. कोठाळवाडी, ता. कळंब जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चिंचेच्या फोकाने, वायरने मारहाण केली. फिर्यादीची भावजय व आजोबा यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धामकी दिली.अशा मजकुराच्या मनिषा काळे यांनी दि.20.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                               

From around the web