धाराशिव शहरात महिलेच्या त्रासास कंटाळून तरुणाची आत्महत्या
धाराशिव : मयत नामे-बालाजी बळीराम भंडारे, वय 34 वर्षे, रा. वाडी बामणी, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.10.08.2023 रोजी 14.00 ते 14.30 वा. सु भाड्याने राहत असलेल्या शुभांगी नंदु जगताप हिचे बेडरुममध्ये साईरामनगर उस्मानाबाद येथे गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे 1) शुभांगी नंदु जगताप, रा. साईरामनगर उस्मानाबाद जि. उस्मानाबाद हिचे त्रासास कंटाळून बालाजी भंडारे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या नानासाहेब अंबादास लांडे-पवार, वय 48 वर्षे, रा. बामणी ता. जि. उस्मानाबाद यांनी दि. 14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो ठाणे येथे भा.दं. वि. सं कलम- 306, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सरकारी नोकराच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल
नळदुर्ग : फिर्यादी नामे- नितीन सखाराम राठोड, वय 32 वर्षे, पोलीस अंमलदार/339 ने पोलीस ठाणे नळदुर्ग सोबत सहकरी असे डायल 112 वरील आलेला कॉल मधील तक्रारदार यांचे घरी जावून तक्रार दार यांचे मुलास समजावून सांगत असताना आरोपी नामे- करण बधुकर लोखंडे, रा. रहीमनगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांनी नितीन राठोड यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणला व बांधलेला कुत्रा चावण्यासाठी अंगावर सोडल्याने कुत्रयाने फिर्यादीच्या पायास चावून जखमी केले. अशा मजकुराच्या नितीन राठोड यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 353, 380, 332, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे
.