मलकापूरचे  एकनाथ लोमटे महाराज यांना बलात्कार प्रकरणी अटक 

 
s

येरमाळा - कळंब तालुक्यातील मलकापुर येथील तथाकथित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांना येरमाळा पोलीसांनी  पंढरपुर येथे अटक केली आहे.दर्शनासाठी आलेल्या एका महिलेवर  गुंगीचं औषधं देऊन बलात्कार केल्याचा आरोप लोमटे महाराज यांच्यावर आहे. 

मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांचे सर्वेसर्वा स्वयंघोषित राष्ट्रसंत  एकनाथ लोमटे  महाराज यांनी परळी येथील एका महिलेवर  लैगिंक अत्याचार केला होता. याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याऐवजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे लोमटे महाराज यांना तात्काळ  जामीन मिळाला होता. त्यानंतर सदर महिलेने न्यायालयात दाद मागितली असता, न्यायालयाने लोमटे यांच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद करण्याचा  आदेश दिला . न्यायालयाच्या आदेशानुसार येरमाळा पोलिसांनी लोमटे महाराज  यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि पंढरपूर येथे अटक केली आहे. 

x


कळंब तालुक्यातील मलकापूर येथे  एकनाथ लोमटे  महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराजांची ख्याती आहे . 28 जुलै 2022 रोजी मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांचे सर्वेसर्वा स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील 35 वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात बसली असता महाराजांनी महिलेस प्रवचन हॉलच्या खोलीमध्ये बोलून घेत महिलेचा विनयभंग केला होता. लोमटे महाराजांनी आपणावर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने करूनही येरमाळा पोलिसांनी  विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र न्यायालयाने चपराक देताच, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि पंढरपूर येथे अटक केली आहे. 

d

काय आहे संपूर्ण प्रकरण?

लोमटे महाराजाविरोधात यापूर्वी भोंदूगिरी करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. याच महाराजाने महिला दर्शनासाठी आली असता तिचा विनयभंग केला. इतकच नाही तर मी तुला गुंगीचं औषधं देऊन तुझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ देखील शूट केल्याची धमकी देखील लोमटे महाराजाने पीडित महिलेला दिल्याची माहिती समोल आली. या पीडितेच्या तक्रारीवरुन लोमटे महाराजावर गुन्हा दाखल झाला. 


मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांचे सर्वेसर्वा स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्यावर अनेक आरोप असून, या महाराजांविरुद्ध अनेक तक्रारी आहेत. 

From around the web