मलकापूर : सरपंच आणि ग्रामसेवकाकडून १ कोटींचा शासकीय निधी हडप  

 
crime

येरमाळा  : कळंब तालुक्यातील मलकापूर येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून एक कोटींचा शासकीय निधी हडप केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी नामे-1) सरपंच- रुक्मीन आगतराव घोळवे, रा. मलकापूर, ता. कळंब जि. उस्मानाबाद 2) मलकापूर ग्रामपंचायत ग्रामसेवक- दिपक लक्ष्मणराव वेदपाठक यांनी दि.22.06.2023 रोजी 10.00 ते 23.59 वा. सु. ग्रामपंचायत मलकापूर येथे संगनमत करुन शासनाची एक कोटी रुपयाचा निधी हडप करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत कार्यालय मलकापुरचे मासिक सभा ठराव व नाहरकत प्रमाणपत्र हे दस्तऐवज बनावट तयार करुन शासनाची फसवणुक केली. अशा मजकुराच्या तुकाराम जगन जाधव, वय 57 वर्षे रा. विस्तार अधिकरी पंचायत समिती कळंब यांनी दि.09.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दोन चोरीचे  गुन्हे दाखल 

धाराशिव   : फिर्यादी नामे-चिन्मय चंद्रकांत कुलकर्णी,(वाघोलीकर), वय 24 वर्षे, रा.वाघोली, ता. जि. उस्मानाबाद हा. मु. समता कॉलनी, ता.जि उस्मानाबाद यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची पॅशन एक्सप्रो राखाडी रंगाची मोटरसायकल क्र युपी 25 बीएल 1005 ही दि. 06.08.2023 रोजी 19.30 दि.07.08.2023 रोजी 10.30 वा. सु. फ्लॅट नं 112 बी अष्टविनायक रेसीडन्सी हंबीरे हॉस्पीटल जवळ सांजा रोड उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या चिन्मय कुलकर्णी यांनी दि.09.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : फिर्यादी नामे-जहिरोद्दीन अल्लाउद्दीन मुगळे, वय 44 वर्षे, रा.दाळींब, ता. उमरबा जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची मोटरसायकल काळ्या रंगाची फॅशन प्रो क्र एमएच 13 बीजे 7309 ही दि. 03.08.2023 रोजी 00.30 दि.04.08.2023 रोजी 06.00 वा. सु. जहिरोद्दीन मुगळे यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या जहिरोद्दीन मुगळे यांनी दि.09.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web