लोहारा : अवैध गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल

 
Osmanabad police

लोहारा - लोहारा पोलीस ठाण्याचे पथक दि. 19.10.2021 रोजी 21.40 वा. सास्तुर गावातील चौकात कर्तव्यास असतांना पथकाने बाजूस उभ्या असलेल्या इनोव्हा कार क्र. एम.एच. 14 ईपी 7986 ची संशयावरुन झडती घेतली.  यावेळी वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखू, गुटखा सदृश्य पानमसाल्याच्या पुड्या असलेली 35 पोती आढळली. यावरुन पोलीसांनी वाहनासह नमूद साठा जप्त करुन अन्न व औषध प्रशासनास माहिती दिली होती. या प्रकरणी पोकॉ- लक्ष्मण भोपळे यांनी दि. 25.10.2021 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 सह मो.वा.का. कलम- 24 (2)/ 177 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत कारवाई

उस्मानाबाद : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन मुरुम पोलीसांनी दि. 25.10.2021 रोजी हद्दीत छापे मारले. यात नाईकनगर येथील किरण पवार हे आपल्या राहत्या घरासमोर एका कॅनमध्ये 5 लि. गावठी दारु बाळगलेले तर शास्त्रीनगर तांडा, दाळींब येथील शंकर चव्हाण व दिपक राठोड हे आपापल्या घरासमोर 2,580 ₹ किंमतीच्या देशी- विदेशी दारुचा साठा बाळगलेले आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 65 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा पोलीस दि. 24.10.2021 रोजी 22.30 वा. गस्तीस असतांना हुतात्मा स्मारक परिसरात गणेश माने व हर्ष चव्हाण हे दोघे मद्यधुंद अवस्थेत विनाकारण आरडाओरड करुन सार्वजनिक शांतता भंग करत असल्याचे आढळले. यावरुन पोना- अतुल जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web