भूम : जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

भूम : भुम पोलीस ठाण्याचे पथक दि. 05.11.2021 रोजी 03.00 वा. सु. वंजारवाडी येथे रात्रगस्तीस असताना 1)राजा वसीन शेख 2)सैफन राजा शेख 3)जावेद हारुण कुरेशी, तीघे रा. बारामती 4)जलील कुरेशी, रा. उस्मानाबाद हे मिनीट्रक क्र. एम.एच. 42 टी 1672 मध्ये दाटीवाटीने जनावरे भरुन निर्दयतेने वाहतुक करत असतांना आढळले. यावरुन भुम पो.ठा. चे पोलीस हेडकॉन्स्टेबल- शाहुराज ओव्हळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन प्राण्यांचे परिवहन कायदा सह महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा कलम- 47, 54, 56 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 119 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल

तामलवाडी : एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 3926 व बस क्र. के.ए. 28 एफ 2185 या दोन बस दि. 05.11.2021 रोजी 14.30 वा. सु. तामलवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन जात असतांना अनोळखी व्यक्तीने बस चालक व आतील प्रवासी यांच्या जिवीतास धोका होईल अशारितीने नमूद दोन्ही बसवर दगड फेकून मारुन बसच्या काच फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 3926 चे चालक- राम ज्ञानदेव वाघमारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 336, 427 सह सार्वजनिक संपत्ती अधिनियम कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web