भूम : ग्रामसेवकास  अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

भूम  : भूम तालूक्यातील वाल्हा ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक- ओमप्रकाश नागटिळक हे दि. 29.11.2021 रोजी 10.00 वा. सु. कर्तव्यावर असतांना ग्रामस्थ- प्रदीप दत्तात्रय शेळवणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालय दुरुस्तीच्या वादातून नागटिळक यांना शिवीगाळ करुन गचांडी धरुन पोटात बुक्क्यांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे लोकसेवकाच्या शासकीय कर्तव्यात शेळवणे यांनी जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन ओमप्रकाश नागटिळक यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरीत्या वाहन उभा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

परंडा : भारत सोपान बिडवे, रा. हिंगणगाव, ता. परंडा यांनी दि. 29.11.2021 रोजी 11.30 वा. सु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, परंडा येथील रस्त्यावर क्रुझर क्र. एम.एच. 13 वाय 816 ही रहदारीस धोकादायपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीच्या दोन घटना 

कळंब : सावरगाव (पु.), ता. कळंब येथील दत्ता स्वामीसिंग परदेशी व रेखा परदेशी या दोघांनी पुर्वीच्या वादावरून दि. 29.11.2021 रोजी 11.30 वा. सु. ग्रामस्थ- रेश्मा मधुकर काशीद यांसह त्यांच्या मुलीस राहत्या गल्लीत शिवीगाळ करुन उसाने मारहान करुन जखमी केले. तसचे रेश्मा यांच्या मुलीच्या डोळ्यात मीरचीपुड टाकली. अशा मजकुराच्या रेश्मा काशीद यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत डिकसळ, ता. कळंब येथील शाहु किशन जाधव व काका या दोघा पिता- पुत्रांनी दि. 17.11.2021 रोजी 07.30 वा. सु. डिकसळ शिवारात भाऊबंद- ज्ञानेश्वर बन्सी जाधव यांना शेत बांधावर जनावरे चारल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर जाधव यांनी दि. 29 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                           

From around the web