भूम : वाहन पेटवून नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

भूम  : पुर्वीच्या वादाच्या कारणावरुन पाटसांगवी, ता. भुम येथील सचिन संदीपान आलाट, नितीन निशीकांत आलाट या दोघांनी दि. 27 सप्टेंबर रोजी 03.00 वा. सु. गावकरी- नवाब बाबा पठाण यांच्या शेतातील शेडसमोर उभा असलेला पिकअप वाहन क्र. एम.एच. केपी 2577 हा पेटवून देउन निघून गेले. अशा मजकुराच्या नवाब पठाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकायदायकपने वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखल

मुरुम  : राम मुकूंद केकडे, रा. येणेगूर, ता. उमरगा यांनी दि. 27 सप्टेंबर रोजी येणेगूर येथील बस स्थानकात रहदारीस धोकादायकपने आपल्या ताब्यातील ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एन 0741 उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.


मारहाण 

उस्मानाबाद : पार्वती साखरे, रा. तुळजापूर नाका, उस्मानाबाद या दि. 26 सप्टेंबर रोजी राहत्या कॉलनीत वाहनातून उतरत असतांना लाला शेख, रा. वैराग नाका, उस्मानाबाद यांनी पुर्वीच्या वादावरुन पार्वती साखरे यांना शिवीगाळ करुन बुक्क्यांनी, पट्ट्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या पार्वती साखरे यांनी दि. 27 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web