अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : कोल्हेगावच्या तरुणास अटक 

 
crime

कळंब  : आरोपी नामे- अभिषेक महादेव ओव्हाळ, वय 23 वर्षे रा. कोल्हेगाव ता.जि. उस्मानाबाद यांनी एका 17 वर्षीय तरुणीशी (नाव- गाव गोपनीय) गाडीवरुन घेवून जावून जवळीक साधून तिला मिठी मारुन दि.01.08.2023 रोजी तीच्याशी लैंगीक संबंध प्रस्थापीत केले. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दि. 02.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 376 (अ) (ब) सह पोक्सो 4, 8 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


दोन ठिकाणी हाणामारी 
 

वाशी  : आरोपी नामे-1)राजेंद्र चंद्रकांत थोरबोले, 2) चंद्रकांत बाबु थोरबोले, 3) दाजीबा चंद्रकांत थोरबोले, सर्व रा. गोजवाडा, ता. वाशी जि. उस्मानाबाद यांनी दि. 30.07.2023 रोजी 18.30 वा. सु. फिर्यादीचे घरा समोर फिर्यादी नामे- कृष्णा बबन आरण, वय 23 वर्षे, रा. गोजवाडा, ता. वाशी जि. उस्मानाबाद हे त्यांचे घरासमोर आई सोबत बोलत असताना राजेंद्र थोरबोले यांनी कृष्णा यास घरात घुसून  शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, कुह्राडीचे दांड्याने मारहाण करुन जखमी केले. कृष्णा यांची आई व आजी या त्यांचे बचावास आल्या असता त्यांसही जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कृष्णा आरण यांनी दि.02.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 34 सह अ.जा. ज.अ.प्र. कायदा कलम 3(1)(आर)(एस), 3 (2)(व्हिए)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी :आरोपी नामे 1) ज्ञानराज उर्फ माउली आण्णासाहेब गुंड, 2) गजानन गुंड दोघे रा. सुरतगाव अन्य 2 यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि. 01.08.2023 रोजी 03.30 वा. सु.  तामलवाडी शिवार येथे फिर्यादी नामे- महेश भिमराव गायकवाड, वय 30 वर्षे, रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने, काठीने डोक्यात मारुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महेश गायकवाड यांनी दि.02.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web