परंडा तालुक्यातील १४ वर्षीय मुलीचे अपहरण 

उस्मानाबाद जिल्ह्यात मारहाणीच्या दोन घटना  
 
Osmanabad police

उस्मानाबाद  : परंडा तालुक्यातील एक 14 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 11.01.2022 रोजी रात्री 01.30 वा. सु. तीच्या अंथरुणात कुटूंबीयांस न दिसल्याने त्यांनी तीचा शोध घेउन परिचितांकडे विचारपुस केली. परंतू काही उपयुक्त माहिती  न मिळाल्याने तीचे अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दि. 11 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाणीच्या दोन घटना  

परंडा  : बावची, ता. परंडा येथील गुरुदास आप्पाराव सायकर यांनी रोपळे, ता. माढा येथील रामचंद्र मालु वाघमारे यांना फोनद्वारे शिवीगाळ केली होती. याचा जाब संतोष यांचा मुलगा- संतोष वाघमारे यांनी दि. 06.01.2022 रोजी 23.00 वा. सु. गुरुदास सायकर यांना त्यांच्या घरी जाउन विचारला असता सायकर यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने संतोष यांच्या डोक्यात काठी मारुन जखमी केले. तसेच संतोष यांना ढकलून दिल्याने ते जमीनीवरील दगडाव पडल्याने जखमी झाले. अशा मजकुराच्या रामचंद्र वाघमारे यांनी दि. 11 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत कौडगाव, ता. परंडा येथील प्रविण पांढरे, अशोक पांढरे, भालु पांढरे, कालीदास पांढरे, प्रतिक पांढरे, नानासाहेब चोपडे, आसराबाई चोपडे, मैनाबाई पांढरे या सर्वांनी शेतजमिनीच्या वादावरुन दि. 04.01.2022 रोजी 19.00 वा. सु. ग्रामस्थ- मारुती जनार्धन चोपडे यांसह त्यांची पत्नी- सविता, भाऊ- सुग्रीव व मुलगा- संजय यांना त्यांच्या घरासमोर लोखंडी गज, कत्ती, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. या मारहानीत मारुती यांचा डाव्या पायाचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या मारुती चोपडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : गणेशनगर, कळंब येथील अंगद श्रीमंत बारगुले हे कामास असलेल्या कळंब येथील खाजगी वित्तव्यवस्थेची कर्जवसुलीची नोटीस भिमनगर, कळंब येथील निलेश घाटपारडे यांना आल्याने या कारणावरुन निलेश यांसह ग्रामस्थ- जलील शेख, श्याम शिंपले, नितीन गायकवाड, गुड्या गायकवाड, बंटी बचुटे या सर्वांनी  दि. 10.01.2022 रोजी 02.15 वा. सु. कळंब येथील डॉ. आंबेडकर चौकात अंगद यांसह त्यांचा चुलत भाऊ- सुजित राजेंद्र बारगुले यांना शिवीगाळ लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने नमूद लोकांनी अंगद बारगुले यांच्या डोळ्याजवळ लोखंडी गज मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुजित बारगुले, रा. पिंपळगाव (डोळा), ता. कळंब यांनी दि. 11 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 307, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web