उस्मानाबाद जिल्ह्यात अपहरण , विनयभंग , चोरीचे गुन्हे दाखल 

 
Osmanabad police
अपहरण 

उस्मानाबाद  : वाशी तालुक्यातील एका 17 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) गावातीलच एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून दि. 04- 05.12.2021 दरम्यानच्या रात्री तीच्या घरातून तीचे अपहरन केले. अशा मजकुराच्या मुलीच्या आईने दि. 11 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 366 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

विनयभंग 

उस्मानाबाद  : एका पुरुषाने गावतीलच एका 35 वर्षीय महिलेचा (नाव- गाव गोपनीय) दि. 11.12.2021 रोजी 13.00 वा. सु. पाठलाग करुन तीचा रस्ता अडवून तीच्यासोबत झोंबाझांबी करुन तीचा विनयभंग केला. यावर त्या महिलेने त्यास विरोध केला असता त्याने तीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 341, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरीचे दोन गुन्हे 

उस्मानाबाद : वाघोली, ता. उस्मानाबाद येथील सुरेश दरिश्चंद्र पाटील यांच्या वाघोली येथील शेतातील 6 पोती सोयाबीन त्यांच्या सालगड्याने दि. 12- 13.11.2021 दरम्यानच्या रात्री चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुरेश पाटील यांनी दि. 11 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : ख्वॉजानगर, उस्मानाबाद येथील शेख मुख्खीम महेबुब यांची हिरो सिडी डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 13 एव्ही 5295 ही दि. 04.12.2021 रोजी पहाटे 05.00 वा. सु. त्यांच्या राहत्या गल्लीतून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शेख यांनी दि. 11 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web