खानापूर : भाचीच्या घरी आलेल्या आत्याचा खून

उस्मानाबाद - बिबवेवाडी (सु.), पुणे येथील उत्तम दिगंबर शिंदे, वय 68 वर्षे व कांता शिंदे हे दोघे पती- पत्नी उस्मानाबाद तालुक्यातील खानापुर येथील भाचीच्या घरी कार्यक्रमास आले होते. दि. 30.12.2021 रोजी 06.00 वा. सु. उत्तम शिंदे हे प्रात: विधीसाठी बाहेर गेले असता अज्ञात तीन व्यक्तींनी अज्ञात कारणावरुन त्यांना मारहान करुन जखमी केल्याने ते पुणे येथे उपचारा घेत असतांना दि. 07.01.2022 रोजी मयत झाले. अशा मजकुराच्या कांता उत्तम शिंदे यांनी दि. 21.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहान
उस्मानाबाद : नाईकवाडी नगर, उस्मानाबाद येथील कलानंदकुमार शंभु मेहता हे दि. 21.01.2022 रोजी 19.30 वा. सु. शहरातील परीमल मंगलकार्यालय समोरील रस्त्याने जात होते. यावेळी ग्रामस्थ- प्रशांत साळुंखे व आशिष पेठे या दोघांनी त्या ठिकाणाहून रहदारी न करण्याच्या कारणावरुन कलानंदकुमार मेहता यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वीटाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कलानंदकुमार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.