करवंजीत मर्डर 

 
crime

उस्मानाबाद  : करवंजी, ता. लोहारा येथील तानाजी त्र्यंबक कदम यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून दि. 04.03.2022 रोजी 18.00 वा. सु. गाव शिवारात ग्रामस्थ- प्रभावतीबाई भिमराव बेडगे, वय 65 वर्षे यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांचा खून केला. अशा मजकुराच्या प्रताप अप्पाराव माने, रा. करवंजी यांनी दि. 05.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 307, 324 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाणीचे दोन गुन्हे 

उस्मानाबाद : बेगडा, ता. उस्मानाबाद येथील शिवलींग बापु गिराम यांनी दि. 04.03.2022 रोजी 15.00 वा. सु. आपल्या घरासमोरी रस्त्यावर ज्वारी धान्य वाळत घातले होते. या कारणावरुन शेजारी- ज्ञानेश्वर लक्ष्मण सुतार यांनी शिवलींग गिराम यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केल्याने शिवलींग गिराम यांच्या रक्ताच्या उलट्या झाल्या. अशा मजकुराच्या शिवलींग गिराम यांनी दि. 05.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
येरमाळा  : तेरखेडा, ता. वाशी येथील जयदेवी माळी, कांता सदवदे, दिक्षा सदवदे, तानाबाई सदवदे, कुणाल साळवे, जितेंद्र सदवदे, संकेत सरवदे, स्वप्नील सरवदे, प्रीती सरवदे या सर्वांनी दि. 03.03.2022 रोजी 15.00 वा. सु. ग्रामस्थ- ध्नश्री राजेंद्र मगर यांच्या घरात घुसून नळजोडणी च्या नळास पाणी भरण्याच्या कारणावरुन धनश्री यांसह त्यांच्या आईस शिवीगाळ गरुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच जयदेवी माळी यांनी धनश्री व त्यांच्या आईच्या हातावर गळ्यावर चाकूने वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या धनश्री मगर यांनी दि. 05.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web