कळंब  : लोखंडी गावठी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल 

 
crime

कळंब  : कळंब पो.ठा. चे पथक दि07.06.2023 रोजी 17.35 वा. सु. अंदोरा शिवारातील हॉटेल येडेश्वरी जवळ रोडच्या कडेला असताना जुनी दुध डेअरी, कळंब येथील- सचिन ऊर्फ संतोष बब्रुवान काळे हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे अंदाजे 20,000 ₹ किुमतीचे एक लोखंडी गावठी कट्टा, दोन खोके पांढरट रंगाचे जिवंत काडतुस किं अंदाजे 200 असे  बेकायदेशीररीत्या जवळ बाळगलेला पथकास आढळला. यावर पथकाने सचिन यास ताब्यात घेउन त्यांच्याजवळील ती गावठी कट्टा व जिवंत काडतुस असे जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध गुटखा विक्री करणाऱ्याकर गुन्हा दाखल

धाराशिव  : दर्गा रोड, उस्मानाबाद येथील- उमर फारुख खलील शेख, हे दि. 07.06.2023 रोजी 11.30 वा. सु. सफा किराणा व जनरल स्टोअर्स विजय चौक, दर्गा रोड उस्मानाबाद येथे गुटखा 40,903 ₹ किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु, पान मसाला विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेला उस्मानाबाद शहर पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी प्रतिबंधीत गुटखा व तत्सम पदार्थासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द कलम- 26(2)(i),26 (2) (iv), 27 (3) (e), 30(2) दंडनीय कलम 59 भा.द. सं. कलम 328, 188, 272, 273, अंतर्गत उस्मानाबाद शहर येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web