कळंब : चोरीच्या मालासह आरोपी दुसऱ्या दिवशीच ताब्यात

 
s

कळंब : कळंब येथील भक्ती काळे यांच्या ढोकी रस्त्यावरील ब्युटी पार्लर दुकानाचे व सुनिल बाजार परिसरातील कल्याण जगताप यांच्या मोबाईल दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 01- 02.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून पार्लरमधील सौंदर्य प्रसाधने, इमीटेशन दागिन्यांसह मोबाईल दुकानातील सोनी कंपनीची संगीत यंत्रणा संच (होम थिएटर), 5 भ्रमणध्वनी असे एकुण 1,05,500 ₹ किंमतीचे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी भक्ती काळे यांचे पती- धर्मराज काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            तपासादरम्यान कळंबचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. आर. रमेश यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच कळंब पो.ठ. चे प्रभारी पोनि-  यशवंत जाधव, पोउपनि- चाटे, पोहेकॉ- कोळेकर, पोना- सुनिल हांगे, शिवाजी राऊत, मिनाज शेख, अमोल जाधव, राजू सय्यद यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यशैलीचा अभ्यास केला. यातून प्राप्त गोपनिय खबरेवरुन पोलीसांनी आज दि. 03 नोव्हेंबर रोजी कळंब येथील एका 15 वर्षीय मुलास (विध संघर्ष ग्रस्त बालक) ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देउन नमूद चोरीतील लपवलेला माल पोलीसांना काढून दिला.

From around the web