कळंब : खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस आजन्म कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा

 
court

कळंब : कळंब पोलीस ठाणे गुन्हा क्र. 221/ 2017  नुसार खूनाच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायय पोलीस निरीक्षक- श्रीमती धस यांनी करुन करंजकल्ला, ता. कळंब येथील ग्रामस्थ बबन बालाजी पवार उर्फ विष्णु याच्याविरुध्द उस्मानाबाद सत्र न्यायालयात सत्र खटला क्र. 3 / 2018 दाखल केला होता. या खटल्याचा निकाल आज दि. 10.12.2021 रोजी जाहिर होउन बबन यास भा.दं.सं. कलम- 302 च्या उल्लंघनाबद्दल आजन्म कारावासासह 20,000 ₹ दंडाची तसेच दंड न भरल्यास 5 महिने साध्या कारावासाची शिक्षा सत्र न्यायदंडाधिकारी क्र. 3 श्रीमती मखरे यांनी सुनावली आहे.

हाणामारीचे दोन गुन्हे 

भूम  : जिजाउ नगर, भुम येथील सुरेश महादेव गाढवे हे दि. 08.12.2021 रोजी 11.00 वा. सु. गावातील बस स्थानकासमोरील एका चप्पल दुकानासमोर थांबले होते. यावेळी गावकरी- विकी जावळे, श्रावण जावळे, धिरज शिंदे, अजय वाघमारे यांसह दोन अनोळखी पुरुषांनी, “तु ईथे काय करायलास, तुझे इथे काय काम आहे.” असे सुरेश गाढवे यांना म्हाणून नमूद सर्वांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी केली. यावेळी विकी जावळे यांनी गाढवे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील 9,500 ₹ रक्कम बळकावली. तसेच गाढवे यांच्या बचावास सरसावलेल्या धनंजय गाढवे यांनाही नमूद लोकांनी मारहान करुन चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सुवर्ण साखळी हिसकावली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुरेश गाढवे यांनी दि. 09 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : तरे ग्रामस्थ- दिलीप पेठे, अविदा पेठे, ओम पेठे या तीघांनी जुन्या वादावरुन दि. 08.12.2021 रोजी 10.00 वा. सु. गावकरी- अनिता मल्हार काळे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन अनिता यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या अनिता काळे यांनी दि. 09 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web