कळंब : चोरीच्या चार मोटारसायकलसह आरोपी ताब्यात

 
s

कळंब  : चोरीच्या मोटारसायकलच्या शोधार्थ कळंब पो. ठा.चे पोनि- श्री यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील सपोफौ- पठाण, पोहेकॉ- सुनिल कोळेकर, पोना- मनोज दळवी, पठाण, पोकॉ- अमोल जाधव, मिनाज शेख, अजीज शेख यांचे पथक आज दि. 10 सप्टेंबर रोजी गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पाथर्डी येथील अनिल लाला पवार हा 25 वर्षीय तरुण चोरीच्या मोटारसायकली बाळगून आहे. 

यावर पथकाने अनिल पवार यास ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 4 मोटारसायकल आढळल्या. पथकाने त्या मोटारसायकल बाबत मालकी- ताबा या विषयी त्यास विचारले असता त्याने समाधानकार माहिती दिली नाही. यावर पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी त्याच्या ताब्यातील मोटारसायकल सांगाडा- इंजीन क्रमांकाच्या सहायाने तांत्रीक तपास केला. यात 2 मोटारसायकल या कळंब पो.ठा. गु.र.क्र. 246, 287 / 2021 या गुन्ह्यांत तर 1 मोटारसायकल शिराढोन पो.ठा. हद्दीतून आणि उर्वरीत 1 मोटारसायकल ही बीड जिल्ह्यातून चोरीस गेल्याचे पथकास समजले.यावर पोलीसांनी अनिल पवार यास चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले असून त्यांच्या उर्वरीत साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. 

चोरीच्या दोन घटना 

उस्मानाबाद  : प्रविण व्यंकटराव पेठे, रा. उस्मानाबाद यांच्या साठेनगर, उस्मानाबाद येथील दुध शितकरण केंद्राचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 09 सप्टेंबर रोजी 10.00 वा. पुर्वी तोडून आतील किर्लोस्कर कंपनीचे 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा जनरेटर संच, कॉम्प्रेसर, लँट वजन काटा, लोखंडी सिडी व सेल अँड ट्युब कंडेसर असे साहित्य चोरुन नेले. यावरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : प्रमोद प्रभाकर निंबुळकर, रा. उमरगा यांनी त्यांच्या घरासमोर लावलेला ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 29 बीई 1646 हा त्यात असलेल्या 15 लोखंडी बाज, 10 टारपोलीन व 2 गाद्या अशा साहित्यासह ॲपे मॅजीक दि. 09 सप्टेंबर रोजीच्या पहाटेच्या सुमारास अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रमोद निंबुळकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web