कळंब : अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
crime

कळंब  : येरमाळा ते कळंब येथे रोडलगत प्रथम वर्ग न्यायालया समोर वैध गुटखा वाहतूक  करणाऱ्या पिकअपवर पोलिसांनी गुन्हा दाखल  11,27,700 ₹ चा माल जप्त केला आहे. 

कळंब पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 22.02.2023 रोजी 00.30 वा. सु. नाकाबंदी दरम्यान येरमाळा ते कळंब येथे रोडलगत प्रथम वर्ग न्यायालया समोर रस्त्यावर पिकअप क्र. एम.एच. 25 पी 6555 ही संशयावरुन थांबवून पिकअप मधील अमित महादेव घुले, वय 32 वर्षे, राहूल अभिमान सावंत, वय 24 रा. दत्तनगर, कळंब यांना विचारपुस केली असता ते पथकास उडवा-उडवीची उत्तरे देत होते. 

यावर पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांनी पिकअप  झडती घेतली असता एकंदरीत त्या पिकअपमधून एकुण 5,60 पुडक्यांत गुटखा व तंबाखू पान मसाला जन्य पदार्थ असा 5,96,000 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ वाहून नेत असल्याचे आढळले. यावर पथकाने नमूद गुटखा व वाहतुकीस वापरलेली पिकअप, एक 2 मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकुण 11,27,700 ₹ चा माल जप्त करुन नमूद गुटखा हा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत असल्याची खात्री करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन अमित महादेव घुले, वय 32 वर्षे, राहूल अभिमान सावंत, वय 24 रा. दत्तनगर, कळंब यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम-  328, 272, 188, 34 अंतर्गत पो.ठा. कळंब येथे गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगीरी ही  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक . एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पो.ठा. चे पोनि- गायकवाड, मपोउपनि- साबळे, पोना- शेख, पोकॉ- कोरे, गृहरक्षक दलाचे जवान यांच्या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि-  चाटे हे करीत आहेत.

From around the web