कळंब : लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

कळंब : चोंदे गल्ली, कळंब येथील अनंत वाघमारे यांसह अन्य 15 व्यक्ती हे दि. 18 सप्टेंबर रोजी 19.00 वा. सु. सुमौ चौक, कळंब येथील रस्त्याने विनानोंदनी क्रमांकाच्या ट्रॅक्टर- ट्रॉलीमधून 1 ब्रास गौण खनिज (वाळू) वाहतूक करत असतांना कळंब महसुल विभागाच्या पथकास आढळले. पथकाने त्यास हटकून ट्रॅक्टर- ट्रॉली सोबत घेण्यास सांगीतले असता वाघमारे यांहस त्यांच्या सोबतच्या 15 व्यक्तींनी तसे न करता ट्रॉलीमधील वाळू खाली ओतून ट्रॅक्ट- ट्रॉलीसह घेउन निघुन गेले. यावरुन नायब तहसीलदार- श्री. प्रथमेश भुर्के यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 353, 34 सह गौण खनिज अधिनियम कलम- 21 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

तामलवाडी  : विजय चंद्रशा माळी, रा. सोलापूर व तुकाराम बेलदार, रा. पिंपरी, ता. उस्मानाबाद या दोघांनी दि. 20 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. तामलवाडी येथील महामार्गावर आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ट्रक क्र. एम.एच. 12 एफझेड 3134 व मिनीट्रक क्र. एम.एच. 04 एफडी 6715 हे रहदारीस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

मारहाणीचे दोन गुन्हे 

परंडा : अमोल मटकर, रा. लोणी, ता. परंडा यांच्या शेतातील पावसाचे पाणी गावकरी- हनुमंत दशरथ पाटील यांच्या शेतात जात असल्याने पाटील यांनी दि. 20 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. अमोल यांस ते पाणी न येउ देण्यास सांगीतले. यावर चिउून जाउन अमोल यांसह पोपट मटकर, प्रताप मटकर या तीघांनी हनुमंत पाटील यांना  शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कोयत्याने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हनुमंत पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : शेतातील मुरुम उचलल्याच्या कारणावरुन वाटवडा, ता. कळंब येथील सलीम व समीर सलीम बेग या दोघा पिता- पुत्रांनी दि. 15 सप्टेंबर रोजी 11.00 वा. सु. वाटवडा शेत शिवारात नातेवाईक- शाहुन बशीर बेग यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शाहुन बेग यांनी दि. 20 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web