कळंब : सामाजिक माध्यमांवर अक्षेपार्ह मजकुर प्रसारीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

कळंब : वैभव कवडे, रा. कन्हेरवाडी यांनी समाजात धार्मीक तेड निर्माण होईल असे अपशब्द वापरलेला मजकुर फेसबुक या सामाजिक प्रसार माध्यमावर दि. 09.05.2021 रोजी प्रसारीत केला होता. अशा मजकुराच्या सुनिता सावंत, रा. कन्हेरवाडी यांनी दि. 21 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 153 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीचे तीन गुन्हे 

नळदुर्ग  : शेतातील पाईप लाईन फोडल्याचा जाब सलगरा (मड्डी), ता. तुळजापूर ग्रामस्थ- सचिन विठ्ठल मोरे यांनी दि. 20.11.2021 रोजी 11.00 वा. सु. सलगरा (मड्डी) येथील त्यांच्या शेतात भाऊबंद- सुभाष जनार्धन मोरे, सखाराम सुभाष मोरे, सुमन सुभाष मोरे यांना विचारला असता त्यांनी चिउूनजाउन सचिन मोरे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळई, काठीने मारहान करुन सचिन यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या सचिन मोरे यांनी दि. 21 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : भुखंड वाटणीच्या कारणावरुन शेलगाव, ता. वाशी येथील बबन अंकुश शिंदे यांनी दि. 17.11.2021 रोजी 16.00 वा. सु. ग्रामस्थ- मुरलीधर भगवान खरात यांना त्यांच्या दुकानासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. यात मुरलीधर यांच्या उजव्या हाताचा अंगठ्याचे हाड मोडून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या मुरलीधर खरात यांनी दि. 21 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा  : घरगुती विज जोडणी तोडल्याच्या कारणावरुन तेरखेडा, ता. वाशी येथील उकरंडे कुटूंबातील कल्याण, बालाजी, रंभा, शारदा, अमृता, प्रसाद उकरंडे या सर्वांनी दि. 20.11.2021 रोजी 20.35 वा. सु. ग्रामस्थ- धनश्री राजेंद्र मगर यांनासह त्यांची आई- तारामती यांना त्यांच्या घरासमोर जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. अशा मजकुराच्या धनश्री मगर यांनी दि. 21 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 323 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web