कळंब : मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 
crime

कळंब : बाबा नगर, कळंब ग्रामस्थ- अभिषेक भारत मिटकरी दि.19.02.2023 रोजी 01.55 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रं डी.एन 25 डब्ल्यु 1766 ही कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185,चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल

कळंब  : गांधनपूर, ता. माजलगाव येथील- करीम शेख यांनी दि. 19.02.2023 रोजी 00.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल  क्रं. एम.एच.15 टी 151 ही कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना कळंब पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web