जळकोट : घरफोडीतील मालासह तिघेजण अटकेत

 
x

उस्मानाबाद : जळकोट येथील चंद्रशेखर गायकवाड व अर्जुन सावंत यांच्या घराचे कुलूप दि. 22- 23.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून गायकवाड यांच्या घरातील एलईडी टीव्ही आणि सावंत यांच्या घरातील एक स्मार्टफोन चोरुन नेला होता. यावरुन नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा क्र. 355, 356 /2021 हे दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

            गुन्हा तपासा दरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. पवार, पोउपनि- श्री. माने, पोहेकॉ- जगदाळे, काझी, ठाकुर, पोना- सय्यद, घुगे, टेळे, पोकॉ- जाधवर, ढगारे, सर्जे, मरलापल्ले, आरसेवाड, सावंत, कोळी, घुगे, अरब, गोरे, उंबरे यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास केला. यातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 36 तासांत 1)सुरज दिपक शिंदे 2)मारुती शरणाप्पा विटकर, दोघे रा. हंगरगा पाटी, ता. तुळजापूर 3)सोमनाथ लक्ष्मण पवार, रा. वेताळनगर, तुळजापूर यांना हंगरगा व तुळजापूर येथून ताब्यात चोरीच्या नमूद मालासह ताब्यात घेतले. पोलीस त्यांच्या उर्वरीत साथीदाराचा शोध घेत असुन पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत. 

चोरीचे दोन गुन्हे 

उस्मानाबाद  : मनिषा मस्के, रा. शिवसृष्टी नगर, उस्मानाबाद या त्यांच्या मुलांसह दि. 23.10.2021 रोजी 10.30 ते 17.30 वा. दरम्यान बाहेर गावी गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील कपाटात असलेले 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मनिषा मस्के यांनी दि. 24.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : अजिनाथ नवनाथ तोगे, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा दि. 23 -24.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून घरात असलेल्या कपाटातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 5,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अजिनाथ तोगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web