जळकोट : ट्रक चोरीचा बनाव उघडकीस

ट्रक मालकासह चौघे अटकेत
 
x

उस्मानाबाद  : सातारा येथून उडिशा राज्यात एशियन पेन्टस कंपनीच्या रंगाच्या बादल्या, खोकी असा 28,90,500 ₹ चा माल घेउन जाणारा अशोक लेलँड ट्रक क्र. के.ए. 56- 4136 हा दि. 06- 07.12.2021 रोजीच्या रात्री जळकोट येथे थांबला असता अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. यावर ट्रक चालक- गोविंद बाबु राठोड, रा. इंदीरानगर तांडा, हंगरगा (नळ), ता. तुळजापूर यांनी दि. 08 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा क्र. 404 / 2021 हा तपासास आहे.

            तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- . गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- शैलेश पवार, पोहेकॉ- काझी, शेळके, कवडे, अरब, पोना- अमोल चव्हाण, पोकॉ- सर्जे, ठाकूर, आरसेवाड, आशमोड, उंबरे यांच्या पथकाने समांतर तपासकार्य सुरु केले. तपासादरम्यान पथकास निदर्शनास आले की, मुळ ट्रक मालकानेच सोलापूर येथील राजेश व संतोष कनु राठोड या दोघा भावांना आपला ट्रक चोरण्यास सांगूण व त्यातील नमूद माल हा ठाणे जिल्‌ह्यातील कल्याण येथे लपवून ठेवण्यास सांगीतले होते. यावर पथकाने ट्रक मालक- अशोक सुभाष चव्हाण, रा. जळकोट, ता. तुळजापूर यासह राजेश व संतोष कनु राठोड हे दोघे भाऊ व गुलबर्गा, राज्य कर्नाटक येथील इस्माईल शेख यांस ताब्यात घेउन तपासाअंती नांदेड येथून नमूद ट्रक जप्त करुन त्यातील माल हा कल्याण येथून जप्त केला आहे. 

From around the web