आत्महत्यास प्रवृत्त केले, जिल्ह्यात दोन  गुन्हे दाखल

 
Osmanabad police

तुळजापूर  : वासुदेव गल्ली, तुळजापूर येथील शेटीबा रानोजी शिंदे, वय 65 वर्षे यांनी दि. 16.10.2021 रोजी पहाटे गळफास घेउन आत्महत्या केली. शेटीबा शिंदे यांना कंपनीत कामावर परत घेण्यासाठी गावकरी- भरत पवार, उस्मानाबाद येथील- महादेव रसाळ व पुणे येथील डी.एम.एन्टर प्रायजेस कंपनीचे अज्ञात मालक अशा तीघांनी दि. 10.03.2021 रोजी शेटीबा यांच्याकडून 10,000 ₹ रक्कम घेतली. त्यानंतर त्यांनी शेटीबा यांना कामावर घेण्यास टाळाटाळ करुन घेतलेली रक्कमही परत न केल्याने शेटीबा यांनी कंटाळून आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताच्या पत्नी- सुलोचना शेटीबा शिंदे यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 71 / 2021 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : एका तरुणाने गावातीलच एका 17 वर्षीय मुलीशी (नाव- गाव गोपनीय) मागील काही दिवसांपासून फोनद्वारे अनेकदा संपर्क साधून, “माझ्यासोबत पळुन चल नाहीतर तुझे ते छायाचित्र प्रसारीत करेन.” अशी धमकी देउन त्या मुलीस मानसिक त्रास दिला. या त्रासास कंटाळून त्या मुलीने दि. 03 डिसेंबर रोजी 08.00 वा. सु. गळफास घेउन आत्महत्या केली. अशा मजकुराच्या मुलीच्या आईने दि. 05 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 305 सह पोक्सो अधिनियम कलम- 11, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

उस्मानाबाद  : कळंब तालुक्यातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 23- 24.11.2021 दरम्यानच्या रात्री तीच्या घरातून बेपत्ता झाली. यावर कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता परजिल्ह्यातील एका तरुणाने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असल्याचे समजले. अशा मजकुराच्या मुलीच्या आईने दि. 05 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web