उस्मानाबाद ,उमरगा, माडज, दहिफळ, इंदापूर येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

येरमाळा  : आशा विश्वनाथ माने, रा. दहिफळ, ता. कळंब यांच्या शेतातील पत्रा शेडमधे ग्रामस्थ- कुमार सुभाष खंडागळे यांनी दि. 28.10.2021 रोजी 14.30 वा. सु. प्रवेश करुन आतील कपाटीत ठेवलेली 20,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या आशा माने यांनी दि. 29.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा: शास्त्रीगनर, उमरगा येथील गुरुनाथ अल्लापुरे यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा दि. 28- 29.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने तोडून आतील 40 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 5,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अल्लापुरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या घटनेत माडज, ता. उमरगा येथील जोतीराम मारेकर हे त्यांची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 7262 ही दि. 26.10.2021 रोजी 13.00 ते 13.30 दरम्यान उमरगा बस स्थानकासमोर लाउन बस स्थानकातील शौचालयात गेले असता दरम्यान त्यांची नमूद मो.सा. अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या मारेकर यांनी दि. 29.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : शाहुनगर येथील सुलेखा वाघमारे या दि. 29.10.2021 रोजी 15.30 वा. सु. घरासमोरील अंगनात होत्या. यावेळी एका मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी वाघमारे यांना पत्ता विचारण्याचा बहाना करुन त्यांच्या जवळ आले व त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सुवर्ण मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. अशा मजकुराच्या सुलेखा वाघमारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : इंदापुर, ता. वाशी येथील महादेव कोळी यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 7537 ही दि. 24.10.2021 रोजी 16.30 ते 17.00 वा. दरम्यान वाशी येथील साप्ताहीक बाजार परिसरात लावली असता अज्ञाताने ती चोरुन नेली. अशा मजकुराच्या महादेव कोळी यांनी दि. 29.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरवेरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web