पारगाव, हासेगाव , जकेकुर येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

वाशी  : पारगाव, ता. वाशी येथील ज्योतीबा शंकर कडवकर यांच्या राहत्या घराची कडी दि. 11.11.2021 रोजी 02.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने उघडून घरात प्रवेश करुन आतील 6 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व चांदीचे पैजण, कमरपट्टा व 50,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या ज्योतीबा कडवकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : हासेगाव येथील साईजिनींग व प्रेसिंग कारखान्याच्या कार्यालयाचा कडी- कोयंडा दि. 10- 11.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून कार्यालयातील तिजोरीतील 1,94,737 ₹ रक्कम, लेनोवो सीपीयु व सीसीटीव्हीचा डिव्हीआर बॉक्स चोरुन नेला. अशा मजकुराच्या व्यवस्थापक- नवनाथ वावरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : जकेकुर, ता. उमरगा येथील मोहसीन महेबुब शेख यांची हिरो होंडा पॅशन प्रो. मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीडी 2105 ही दि. 08.11.2021 रोजी 22.30 ते 23.00 वा. दरम्यान उमरगा चौरस्ता येथील सुदर्शन हॉटेलसमोरव्यक्तीने चोरुन नेली.  तर अशा मजकुराच्या मोहसीन शेख यांनी दि. 11.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web