घारगाव, कदेर येथे चोरीची घटना 

कंटेकूर येथे मारहाणीची घटना 
 
Osmanabad police

उस्मानाबाद - घारगाव, ता. कळंब येथील रविंद्र रामविलास तापडे यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 24 झेड 5435 ही दि. 01.11.2021 दरम्यान पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.

दुसऱ्या घटनेत कदेर, ता. उमरगा येथील फुलचंद कुंडलीक गायकवाड यांनी त्यांची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल ही दि. 29.10.2021 रोजी 15.00 ते 15.30 वा. दरम्यान उमरगा येथील पाकीजा हॉटेसमोर लावली असता अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली. अशा मजकुराच्या रविंद्र तापडे व फुलचंद गायकवाड यांनी दि. 05 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत शिराढोन व उमरगा पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.


मारहाण 

मुरुम  : कंटेकुर, ता. उमरगा येथील मोनेश्वर गणपती पोतदार व त्यांचा मुलगा- बाळु यांनी शेत पेरणी व मोजणीच्या कारणावरुन दि. 05.11.2021 रोजी 13.00 वा. सु. कंटेकुर शिवारात भाऊ- विलास गणपती पोतदार यांना शिवीगाळ करुन, दगड, विळ्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या विलास पोतदार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web