अणदूर,इटकळ, बाबळसुर, तुळजापूर येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

नळदुर्ग: अणदुर, ता. तुळजापूर ग्रामस्थ- महादेव मल्लीनाथ करपे यांनी त्यांच्या गट क्र. 183 मधील शेतात ठेवलेल्या 30 पोती सोयाबीन पैकी 6 पोती सोयाबीन दि. 25- 26.11.2021  दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महादेव करपे यांनी दि. 03 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत इटकळ शिवारातील रिलायन्स मनोरॅच्या खोलीतील व्हिजन कंपनीच्या दोन बँटरी व आयपीएमएस एक नग असे साहित्य दि. 02- 03.12.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या गुत्तेदार- बालाजी रामकिसन राठोड, रा. खौंदला, ता. कळंब यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवलाआहे.

उमरगा  : बाबळसुर, ता. उमरगा ग्रामस्थ- माधव तात्याराव सुर्यवंशी यांच्या गट क्र. 141 मधील शेत विहिरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 01.12.2021 रोजी 16.30 वा. सु. गावातीलच एका संशयीताने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या माधव सुर्यवंशी यांनी दि. 03 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : उस्मानाबाद येथील उत्तम लालु चव्हाण हे दि. 24.11.2021 रोजी 01.45 वा. सु. नविन बस स्थानक, तुळजापूर येथे त्यांच्या स्कॉर्पिओ वाहन क्र. एम.एच. 43 एन 8276 मधून प्रवासी सोडत असताना अनोळखी एका स्त्रीसह चार पुरुषांनी संगणमताने उत्तम चव्हाण यांच्या नकळत त्यांच्या स्कॉर्पिओच्या पुढील डीकीत ठेवलेल्या स्मार्टफोनसह 50,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या उत्तम चव्हाण यांनी दि. 03 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web