सुरतगावमध्ये  उकीरड्यावर  टि- शर्ट मध्ये गुंडाळून अर्भक फेकले 

 अपत्य जन्माची लपवणूक करुन विल्हेवाट लावणाऱ्यावर गुन्हा दाखल
 
Osmanabad police

तामलवाडी : अपत्य जन्माची लपवणूक व्हावी व अर्भकाचा मृत्यु व्हावा या अवैध उद्देशाने एक स्त्री  अर्भक टि-शर्ट मध्ये गुंडाळून सुरतगाव येथील एका उकीरड्यावर अज्ञात व्यक्तीने टाकले असल्याचे सुरतगावचे पोलीस पाटील- प्रविण कुंभार यांना दि. 05.01.2022 रोजी 10.35 वा. सु. आढळले. यावरुन प्रविण कुंभार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 315, 318 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरी

तुळजापूर  : तुळजापूर येथील प्रतिक राजकुमार रोचकरी याची हिरो मेस्ट्रो स्कुटर क्र. एम.एच. 25 झेड 2377 ही दि. 26.12.2021 रोजी 15.00 ते 18.00 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या प्रतिक रोचकरी यांनी दि. 05 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web