उस्मानाबादेत सामाजिक माध्यमांवर अक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : प्रतिक गंगावणे, रा. उस्मानाबाद यांच्या इन्स्टाग्राम खात्याचा वापर अज्ञात व्यक्तीने दि. 27 नोव्हेंबर रोजी गंगावणे यांच्या नकळत करुन समाजात धार्मीक तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह छायाचित्र, मजकुर, शिवीगाळ असलेली ध्वनी फित त्या खात्यातून प्रसारीत केली. अशा मजकुराच्या प्रतिक गंगावणे यांनी दि. 28 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 295, 507, 153 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण 

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील एक 17 वर्षीय मुलगी दि. 27.11.2021 रोजी 18.00 वा. सु. कामानिमीत्त घराबाहेर गली असता ती घरी लवकर न परतल्याने तीच्या कुटूंबीयांनी परिसरात, नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता तीच्याबद्दल काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन कोण्या अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या मुलीच्या आईने दि. 28 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


धोकादायकरित्या वाहन चालवणाऱ्या- उभा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

तामलवाडी: अमोल अशोक जगताप, रा. कुंभारी, ता. तुळजापूर यांनी दि. 28.11.2021 रोजी 17.00 वा. सु. तामलवाडी टोल नाका येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर निष्काळजीपने, जिवीतास धोकादायरित्या टाटा एसीई वाहन क्र. एम.एच. 25 एजे 2308 हा चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. तर राहुल बाळु भोसले, रा. भोगाव, ता. सोलापूर यांनी नमूद ठिकाणीच ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 13 सीटी 1969 हा रहदारीस धोकादायपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दाघांविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
 

From around the web