धाराशिव जिल्ह्यात मारहाण , फसवणूक आदी गुन्हे दाखल 

 
crime

ढोकी  : म्होतरवाडी, ता. उस्मानाबाद येथील- मधुकर पाडुळे, रोहित पाडुळे, किशोर पाडुळे, किशोर पाडुळे, पांडु पाडुळे, प्रेमराज पाडुळे यांनी शेताचे बांधावून ट्रॅक्टर नेहु नका असे बोलण्याचे कारणावरुन दि.06.07.2023 रोजी 19.00 वा.सु. म्होतरवाडी शेत गट नं 256 शिवारात  गावकरी- अर्चना संगनाथ चव्हाण व त्यांचा मुलगा दिनेश चव्हाण यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, बेल्टने, लाकडी मेकीने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विकास भराटे यांनी दि.06.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504,506, 143, 147, 148, 149  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 फसवणूक 

तुळजापूर : शांतापूर, ता.जि. नदीया राज्य पश्चिम हा.मु. काक्रंबा येथील- ललन सतिष विश्वास, वय 36 वर्षे यांनी दि.06.07.2023 रोजी काक्रंबा, ता. तुळजापूर येथे कुठल्याही प्रकारचे शिक्षण वैद्यकिय प्रमाणपत्र नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून वैदयकीय व्यवसाय करुन पेश्ंन्टवर औषध उपचार करुन फिस स्वरुपात पैसे घेवून फसवणूक करत असताना मिळून आला. अशा मजकुराच्या डॉ. श्री. नंदकिशोर दत्तात्रय घाडगे यांनी दि.06.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 419, 420 सह इं.मे.का.ॲ. कलम 15(2), म.मे.प्रॅ. ॲ. कलम 33(2)  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद

धाराशिव : स्थानिक गुन्हेशाखेचे पथक वाशी पो.ठा. हद्दीत दि. 07.07.2023 रोजी 14.30 वा. सु. वाशी पेट्रोलिंगला असताना इस्माईल शेख यांचे शेताजवळ असलेल्या ढोपडीत इंदापूर , ता. वाशी येथे  इंदापुर, ता. वाशी  येथील- अमोल बालाजी काळे हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे लोखंडी तलवार अंदाजे 3,500 ₹ किंमतीची ही बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगून असताना गुन्हे शाखेच्या पथकास आढळला. यावर पथकाने अमोल यास ताब्यात घेउन त्यांच्या जवळील ती तलवार जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4/25 अंतर्गत वाशी पो ठा येथे  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web