परंड्यात अवैध कत्तल खान्यावर छापा, सात जणांवर गुन्हा दाखल ...
परंडा - शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती मिळताच, पोलिसांनी छापा ,मारून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद अतुल कुलकर्णी यांनी चालु असलेला श्रावण महिना, आगामी काळातील गणपती उत्सव, नवरात्र उत्सव या सणाच्या पार्श्वभुमीवर गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. दि.05.09.2023 रोजी परंडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन विशेष पोलीस पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे, पोलीस अमंलदार- 636/ गायकवाड, 1269/ राठोड, 684/पवार, 325/कांबळे यांच्या पथकाने दि. 05 09.2023 रोजी 18.45 वा. सु. परंडा शहर येथे रवाना होउन अवैध कत्तल खान्यावर छापा टाकला.
सदर छापा कारवाई मध्ये सदर ठिकाणी काही इसम मिळून आले असता त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) फय्याज अयुब कुरेशी, वय 31 वर्षे, 2) खाजा हुसेन शब्बीर कुरेशी, वय 29 वर्षे, दोघे रा. पंजाब वस्ताद गल्ली, कसाब गल्ली, ता. करमाळा जि. सोलापूर,3) ताजुद्दीन कासम शेख, वय 50 वर्षे, रा.समतानगर परंडा, जि. उस्मानाबाद, 4) असिफ बाबु अरब, वय 25 वर्षे, रा. जवळा, ता. परंडा जि. उस्मानाबाद 5) कलीम आताउर रहेमान मुजावर, वय 40 वर्षे, रा. सोमवार गल्ली परंडा जि. उस्मानाबाद, 6) अजिनाथ राजेंद्र लामकाने, वय 25 वर्षे, रा. समतानगर परंडा, जि. उस्मानाबाद, अशी सागिंतले. त्यांच्या कडे सदर कत्तलखाना कोणाच्या मालकीचा आहे याबाबत विचार पूस करता त्यांनी सदरचा कत्तलखाना हा 7) फाजील इस्माईल सौदागर, वय 48 वर्षे, रा. शिकलकर गल्ली, परंडा ता. परंडा जि. उस्मानाबाद याचा असुन तो विनापरवाना असल्याचे सागिंतले.
सदर छापा कारवाई दरम्यान पोलीस पथकाने नमुद कत्तलखान्यामध्ये मिळून आलेले अंदाजे 9 टन वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस असे एकुण 18,00,000 ₹किंमतीचे, दोन गोवंशीय जातीचे बैल किं अंदाजे 40,000₹, आयशर कंपनीच्या टेम्पो एमएच 46 बीएम 1883 या टेम्पोमध्ये देखील मांस भरलेला, तसेच दुसरा एक टेम्पो क्र एमएच 04 के एफ 6971 मध्ये ही गोवशींय जनावराचे मांस भरलेला, लोखंडी सत्तुर, चाकु, असा एकुण 28,42,160₹ किंमतीचा माल नमुद आरोपीच्या ताब्यात मिळून आला तो जप्त करण्यात आला आहे.
सदर जप्त करण्यात आलेले गोवंशीय जनावरांच्या मांसाचे नमुने प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, परंडा डॉ. पल्ला यांच्या मार्फतीने मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नगरपरिषद परंडा यांच्या डंम्पींगच्या जागेत खड्ड्यात पुरुन नाश करण्यात आला आहे. व जीवंत 2 बैल जनावरे हे गो शाळेत देण्याची कार्यवाही केली आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार- शुभम गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे गुरनं 223/2023 महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(क), 9, 9(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस अंमलदार 1269/ राठोड, 684/पवार,325/कांबळे 636/गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.